श्रावण महोत्सव
श्रावण महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आले.
घास अमृताचा
आईबद्दलच्या भावना तश्या शब्दांत व्यक्त करणं कठीणच. अनेक कर्तुत्ववान व्यक्तींच्या यशात त्यांच्या आईचा वाटा असतो.
मुलाला योग्य दिशा, संस्कार देण्याचं काम आईच करते, कारण जीवनाच्या या शाळेत आईच हा पहिला गुरू असते. आई या शब्दामध्ये ईश्वर सामावला आहे. आई हे ईश्वराचे कार्य निर्मिती आहे.
आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचा मिलाफ. ती आपल्याला जन्म देते, बोलायला-चालायला शिकवते, घडवते, जपते, आधार देते, आपल्यावर प्रेम आणि फक्त प्रेमच करते, तेही निरपेक्ष भावनेनं.
अशा या वात्सल्यमूर्तीबद्दल मुलामुलींच्या भावना, कृतज्ञता व्यक्त करणारा ‘घास अमृताचा’ हे भावानुभव संस्थेने २०१३ मध्ये प्रसिद्ध केले होते.
श्रावण हा सणांचा महिना आणि सण म्हटले की, जिभेचे चोचले पुरविणारे व आनंदाचा आस्वाद देणारे पदार्थ आपल्याला चाखायचे असतात.
तसेच श्रावण महिना आपल्याला विविध सणांनी एकत्रित येणे आणि संघटीत करणे हे शिकवतो. हा उद्देश समोर ठेऊन झेप संस्थेच्या वतीने या श्रावण
महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या माध्यामतून महिलांना एक व्यासपीठ मिळते आणि एका नव्या उमेदीने आयुष्यातील आव्हानांना सामोरे
जाण्याची ताकद मिळते .
विशिष्ट खाद्य पदार्थावर आधारित पक्वान्न तयार करण्यासाठी अनोख्या पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. ग्रामीण भागातील महिलांसोबत
शहरातील महिलांना सुद्धा या स्पर्धेचे नेहमी आकर्षण राहिले आहे.
यामध्ये ८१ लेखकांनी आपल्या आईबद्दलच्या भावना व्यक्त करून मातृदिन साजरा केला होता. श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्या ही मातृदिन म्हणूनही ओळखली जाते. या मातृदिनाचे औचित्य साधून ‘आई असते श्रावण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.