‘झेप’ बद्दल माहिती

‘झेप’ बद्दल माहिती

झेप महिला गृहउद्योग व औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित आंबेपूर

एक महिला बचत गटाची एकत्रित सहकारी संस्था असावी व ती स्थापन व्हावी. याची प्रेरणा आमदार मीनाक्षी पाटील यांच्याकडून घेतली व त्यांच्या आशीर्वादाने झेप महिला गृहउद्योग व औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित आंबेपूर ची स्थापना व नोंदणी दि. ०४ जून २००९ रोजी झाली .

संस्था स्थापन करण्याचा उद्देश हा “एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ” या प्रमाणे आहे. या संस्थेच्या माध्यमातून गरीब, कष्टकरी , गरजू व जिज्ञासू महिलांना एका छताखाली एकत्र करून त्यांना रोजगार मिळवून देणे व त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकारी भावना रुजविणे हा आहे. म्हणून सुरवातीला आपल्या पंचक्रोशीतील म्हणजे आंबेपूर , बांधण , पोयनाड, नवेनगर , चरी , कुरकुडी कोलटेंभी, शहापूर, धेरड इ. गावातील बचत गटामध्ये सहभागी झालेल्या महिला व त्यांनी सक्षमपणे तयार केलेले बचत गट यांना एकत्र करून व त्या बचत गटाद्वारे करीत असलेले छोटे छोटे गृहउद्योग व इतर कामे आणि त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्या करीत असलेली बचत याला एक व्यापक व मोठ्या प्रमाणात एकत्र करून त्यांचे स्वरूप तालुका व जिल्हास्तरापर्यंत वाढविणे हे संस्थेचे पुढील कार्य व मुख्य उद्देश आहे.

संस्थेचे उद्देश :

१) सदस्यामध्ये काटकसर, स्वावलंबन व सहकार यांचा प्रसार होण्यास उत्तेजन देणे.
२) संस्थेच्या व सदस्यांच्या गरजा भागविण्याकरिता भांडवल जमविणे.
३) गृहउद्योग व औद्योगिक मालाचे उत्पादन करणे सागर करवून घेणे (टीप :- संस्थेमार्फत उत्पादन केलेला माल संस्थेच्या मालकाचा राहील . व्यक्तीशः सदस्यान अगर सदस्यांच्या गटांनी आपापल्या जबाबदारीवर तयार केलेला माल जशी वस्तुस्थिती असेल तसे, सदस्यांच्या अगर त्यांच्या गटांच्या मालकीचा राहील )
४) संस्थेच्या स्वतःच्या व तिच्या सदस्यांच्या उपभोगासाठी कच्चा माल, पक्का माल, हत्यारे , अवजारे याचा खरेदी विक्री करणे .
५) सदस्यांचा कच्चा व पक्का माल आपले ताब्यात ठेवून आगाऊ रकमा देणे.
६) संस्थेने व सदस्यांनी तयार केलेल्या मालाची विक्री करणे.
७) गृहउद्योग व औद्योगिक मालाचे धंद्यामधील नवीन सुधारणाविषयक ज्ञानाचा सदस्यांमध्ये प्रसार करणे व त्या सुधारणा अंमलात आणण्याकरिता सदस्यांना उत्तेजन देणे व त्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शनपर शिबीर भरविणे व व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शनपर केंद्र चालविणे .
८) स्वतःच्या व सदस्यांच्या मालाच्या विक्रीचे डेपो (विक्री केंद्र ) चालविणे .
९) माल साठविण्याकरिता गोदामे बांधणे , ती खरेदी करणे , भाड्याने घेणे अगर देणे .
१०) खाद्य पदार्थ तयार करणे उदा. फळांचे मुरंबे , लोणची , पापड, केचप्स , जॅम , जेली , सुपारी , बडीशेप (सोप ) इत्यादीच्या पुड्या करणे .
११) कागद, कापड, काच , लाकूड यांचे पासून खेळणी , बाहुल्या किंवा शोभेच्या वस्तू बनविणे .
१२) शिवणकाम , भरतकाम किंवा शासकीय , निम शासकीय संस्थेतील कर्मचाऱ्यांचे व शाळा कारखाने इत्यादींचे गणवेश तयार करणे , तयार कपडे , उशांचे अभ्रे , हातरुमाल, आदी वस्तू तयार करणे, लोकरांचे स्वेटर्स , मफलर्स , सुती बनियन , पायमोजे इत्यादी बनविणे.
१३) शिवण वर्ग चालविणे .
१४) संस्था उत्पादित मालाचे कंत्राट पद्धतीवर कामे घेणे व ती पूर्ण करून देणे. खरेदी विक्रीव्हे व्यवहार करणे.
१५) खादी ग्रामोध्योगाच्या सौजन्याने बाह्य उद्योग हात कागद, काड्यापेटी , मेणबत्या , उदबत्या व छबी वितरण करणे .

रायगड जिल्ह्यात विशेषतः महिला सक्षमीकरणाच्या कार्यात अग्रेसर असणारी संस्था म्हणून ‘झेप’ संस्था कार्यरत आहे.

खारेपाट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनामुळे झेप संस्था आणि झेप संस्थेच्या अध्यक्षा सौ. चित्रा पाटील यांचे नाव संपूर्ण देशात पोहचले आहे.

झेप या संस्थेने रायगड जिल्ह्यात स्वतःच्या सामाजिक विकासाच्या ध्येयामुळे सामान्य लोकांमध्ये एक विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. संस्थेने परिसरातील महिलांच्या दृष्टीने एक आदर्श निर्माण केला असून, महिलांचा

सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी संस्था अध्यक्षा चित्रा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, आ. जयंतभाई पाटील व आ. पंडितशेठ यांच्या मार्गदर्शनाद्वारे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे.



सौ. चित्राताई पाटील : अष्टपैलू नेतृत्व

सौ. चित्राताई पाटील : अष्टपैलू नेतृत्व

सौ. चित्राताई पाटील : अष्टपैलू नेतृत्व

सौ . चित्रा आस्वाद पाटील हे नाव सध्या रायगड जिल्ह्यात सर्वमुखी झालेले नाव आहे. त्यांच्याकडे असलेल्या विविध गुणकौशल्यांमुळे आणि कार्यकुशलतेमुळे अष्टपैलू व्यक्तिमत्व बनलेल्या चित्राताईनी अल्पावधीतच जे यश संपादन केले आहे त्यास रायगड जिल्ह्यात तोड नाही त्यामुळे चित्राताईंचा उल्लेख जिल्ह्यात उदयोन्मुख अष्टपैलू राजकीय नेतृत्व असा करावा लागेल.

सौ. चित्रा पाटील यांचा जन्म दिनांक – १६ नोव्हेंबर १९७५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला . त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण वेंगुर्ला येथेच झाले. परंतु उच्चशिक्षणासाठी त्यांना पुणे येथील बी.एम.एस.एस. कॉलेज मध्ये जावे लागले. तेथे त्यांनी बी. कॉम व एम. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतले आहे .

त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात त्यांनी शिक्षणासोबतच खेळ व अभिनय क्षेत्रातही चमक दाखविली होती. कबड्डी व बॅडमिंटन या खेळांमध्ये त्यांनी राज्यस्तरीय खेळाडू म्हणून स्थान मिळविले होते . पुणे येथील महाविद्यालयीन जीवनात फिरोदिया आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमास मोठे योगदान दिले होते. कॅम्पस प्लेसमेंट द्वारे त्यांची निवड मार्केटिंग मॅनेजर म्हणून झाली होती . त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पुणे विद्यापीठ व भारत श्रीलंका अशा प्रकल्पांवर काम केले होते .

२००१ च्या फेब्रुवारी महिन्यात अॅड. आस्वाद पाटील यांच्याशी लग्न झाल्यावर सौ. चित्रा पाटील पेझारी येथे आ.मीनाक्षीताईच्या स्नुषा म्हणून राहावयास आल्या. अल्पावधीतच त्यांनी सर्वांना आपल्या कुशलतेने आपलेसे करून सर्वांची मने जिंकून घेतली काही दिवसानंतर त्यांनी पेझारीच्या सभोवतालच्या परिसराचे निरीक्षण केले . आ.मीनाक्षीताई पाटील , अॅड. आस्वाद पाटील, मा. पंडितशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनातून त्यांना एक गोष्ट जाणविली ती म्हणजे परिसरातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत . त्यांना सक्षम बनविण्यासाठी त्यांच्यासमोर आदर्श असावा म्हणून चित्राताई स्वतः पहिल्यांदा आर्थिकदृष्ट्या सबळ होण्याचा निर्णय घेऊन स्वतःच्या कुटुंबियाच्या उद्योगात लक्ष देऊन २००५ साली Indian Oil चा पेट्रोल पंप आणि २००७ साली Bharat Petroleum चा पेट्रोल पंप असे स्वतःचे पेट्रोल पंप उभारून त्यांनी आपल्या उद्योगप्रधान शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात वापर करून घेतला व “आधी केले मग सांगितले” या उक्तीप्रमाणे स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम बनून नंतर त्याचा प्रचार केला.अर्थात त्यासाठी त्यांची निरीक्षण शक्ती कमी आली. आ.मीनाक्षीताई , मा.पंडितशेठयांच्याकडे कामे घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये महिलाही मोठ्या प्रमाणात असायच्या अशा महिलांसाठी काहीतरी करता येईल का? हा प्रश्न त्यांच्यासमोर असायचा त्यातून त्यांनी बचत गटांचे संघटन हा प्रयोग सुरु केले. त्यामध्ये त्यांना यश मिळाले व महिलांना आर्थिक सक्षमतेचा मंत्र देण्यात त्या यशस्वी झाल्या.

चित्राताई पाटील यांच्याकडे एक गुण आहे , तो म्हणजे योग्य व्यक्तीची निवड . कोणत्या व्यक्तीकडे कोणता गुण आहे हे ओळखून त्या व्यक्तीकडे योग्य ती जबाबदारी देणे हा महत्वाचा गुण त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कर्तृत्ववान व्यक्तींची फळी आहे .

सामाजिक, सांस्कृतिक , रोजगार, स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन , तज्ञांबद्दलचा आदर या सर्वामुळे चित्राताई एक अष्टपैलू राजकीय व्यक्तिमत्व बनले आहे . त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ……….!