स्पर्धा

स्पर्धा

महिलांतील विविध कलागुणांना वाव मिळावा, महिलांनी मागे न राहता व्यक्त व्हावे, बोलते व्हावे यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.
– पाक कला स्पर्धा – आपल्या परिसरातील अनेक सुगरण महिला त्यांच्याकडे पाककला कौशल्य असून देखील दुर्लक्षित राहतात.
या महिलांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांच्यातील पाककलेतील दर्शन जगाला व्हावे यासाठी पाककला स्पर्धेचे आयोजन केले जाते.
या स्पर्धेचे वैशिष्ठ म्हणजे या स्पर्धेचे विषय असे असतात कि ज्यातून अनोख्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचे दर्शन जगाला होईल.

– वक्तृत्व स्पर्धा – महिलांमधील कलाकुसरींना योग्य ती संधी प्राप्त होऊन महिलांच्या व्यक्तिमत्व विकासाला वाव मिळावा
यासाठी संस्थेने विविध प्रकारच्या स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केलेल्या आहेत. यामध्ये निबंध लेखन स्पर्धा, महिलांसाठी वत्कृत्व स्पर्धा,
भरतनृत्य स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करून संस्था महिलांमधील सुप्त गुणांना संधी देण्याचे कार्य करीत आहे.
एवढंच न्हवे तर महिलांमध्ये वैचारिक प्रगल्भता निर्माण करण्याचं कामही संस्था करीत आहे.

Zoomed Image