महिला सक्षमीकरण

महिला सक्षमीकरण

सौ. चित्राताईनी पेझारीच्या सभोवतालच्या परिसराचे निरीक्षण केले असता , आ.मीनाक्षीताई पाटील , अॅड. आस्वाद पाटील, मा. पंडितशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनातून
त्यांना एक गोष्ट जाणविली ती म्हणजे परिसरातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत . महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा व त्यांना सक्षम बनविण्यासाठी त्यांच्यासमोर
आदर्श असावा म्हणून चित्राताई स्वतः पहिल्यांदा आर्थिकदृष्ट्या सबळ होण्याचा निर्णय घेऊन स्वतःच्या कुटुंबियाच्या उद्योगात लक्ष देऊन
२००५ साली Indian Oil चा पेट्रोल पंप आणि २००७ साली Bharat Petroleum चा पेट्रोल पंप असे स्वतःचे पेट्रोल पंप उभारून त्यांनी
आपल्या उद्योगप्रधान शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात वापर करून घेतला व “आधी केले मग सांगितले” या उक्तीप्रमाणे स्वतः आर्थिकदृष्ट्या
सक्षम बनून नंतर त्याचा प्रचार केला .अर्थात त्यासाठी त्यांची निरीक्षण शक्ती कमी आली. आ.मीनाक्षीताई , मा.पंडितशेठयांच्याकडे कामे घेऊन
आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात असायच्या अशा महिलांसाठी काहीतरी करता येईल का? हा प्रश्न त्यांच्यासमोर असायचा त्यातून त्यांनी बचत गटांचे संघटन
हा प्रयोग सुरु केले. त्यामध्ये त्यांना यश मिळाले व महिलांना आर्थिक सक्षमतेचा मंत्र देण्यात त्या यशस्वी झाल्या.

ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काय करता येऊ शकेल याचा आढावा घेत असतांना त्यांनी पाहिले कि आर्थिक सक्षमतेसाठी
उद्योगांमध्ये रुची निर्माण करणे आवश्यक आहे. परिसरातील गाव खेड्यांमधील महिलांमध्ये छोटे छोटे उद्योग करण्याची क्षमता आहे.
त्यांना पुरेशी संधी मिळाल्यास व उद्योगासाठी योग्य बाजारपेठ लाभल्यास आर्थिक सक्षमतेसाठी योग्य वातावरण तयार होऊ शकते
म्हणून चित्राताईनी प्रथमतः मा.भावनाताईच्या सहकार्याने ‘झेप’ महिला सहकारी औद्योगिक उत्पादन संस्था स्थापन केली . सन २००९ मध्ये
स्थापन केलेल्या या संस्थेने प्रथमतः परिसरातील बचत गटांच्या सहाय्याने शासकीय योजना गरजू व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचा उपक्रम हाती
घेतला.

महिला बचतगटांच्या उत्पादनांना ‘खारेपाट महोत्सवाच्या’ निमित्ताने बाजारपेठ मिळाली. बचतगटांमुळे महिला अभ्यासू तसेच बोलक्या होऊन
दु:खामधून सावरण्याची शक्ती त्यांना मिळत आहे. जिद्द, मेहनत, धाडस या बळावर उद्योग व्यवसायातून महिलांना यशस्वीपणे समृध्दी खेचून आणता येऊ शकते हे दाखवून दिले.