खारेपाट महोत्सव
महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ आणि खारेपाटातील संस्कृतीची माहिती नव्या पिढीला देण्याच्या उद्देशाने ‘झेप फाऊंडेशन’तर्फे आयोजित खारेपाट महोत्सवाला अलिबागमध्ये प्रारंभ झाला.
महिलांच सक्षमीकरण , संस्कृती संवर्धनाची जबाबदारी, विविध कलागुणांचे सादरीकरण आणि सोबतच महिला बचत गटाच्या उत्पादनास बाजारपेठ असे समीकरण जुळवत महिलांच्या उद्योगशिलतेत वाढ करण्यासाठी चित्राताईनी “खारेपाट महोत्सव”
२०१२ चे आयोजन करून त्यातून महिला बचत गटांना प्रत्येकी १०००० ते सव्वा लाखापर्यंतचा नफा मिळवून देण्यात त्या यशस्वी झाल्या.
सन २०१२च्या खारेपाट महोत्सवाच्या यशस्वीतेमुळे परिसरातील जनतेकडून खारेपाट महोत्सवाची कालमर्यादा वाढविण्यासाठी
मागणी होऊ लागली. परिणामतः २०१३ चा खारेपाट महोत्सव सहा दिवसीय आयोजित करण्यात आला. या वेळेच्या खारेपाट महोत्सवाने
गर्दीचे विक्रम केले अंदाजे जवळपास अडीच लाख लोकांनी खारेपाट महोत्सवास भेट देऊन चित्रा पाटील यांच्या कार्य कुशलतेला
सलाम केला.
या महोत्सवात पूर्वजांपासून चालणारे कासार, लोहार, सुतार, पाथरवट, गोसावी, चर्मकार आदींचे व्यवसाय, मिठागरे, कोळी लोकांच्या
अंगणातील तुळस व कोळी नृत्य, मलखांब, आदिवासी लोकांचा बाजार व त्यांचे नृत्य, एकपात्री अभिनय स्पर्धा, द्विपात्री अभिनय स्पर्धा, कुस्ती स्पर्धा,
अशा व अनेक गुणधर्मानी या महोत्सवास रंगत आली.
या वर्षी खारेपाट महोत्सव म्हणजे संघटन , संचलन , नियोजन आणि व्यवस्थापन या सर्व प्रशासकीय
कौशल्यांची साक्ष देणारा होता. ८०० कलाकार, 350 खेळाडू, ८५ तंत्रज्ञान, १५०० महिला कार्यकर्त्या आणि कित्येक स्वयंसेवकांच्या सहकार्याने
आयोजित केलेल्या ह्या महोत्सवाने १३० बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली. कोट्यावधी रुपयांची उलाढाल
या महोत्सवात झाली. अर्थात त्याचे सर्व श्रेय चित्राताई बरोबर त्यांचे मार्गदर्शक ठरलेल्या आ.मीनाक्षीताई , मा.आस्वाद पाटील , मा.पंडितशेठ
पाटील , यांच्या सोबतच हजारो कार्यकार्त्यानाही आहे.
Watch on youtube
प्रायोजक