कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
स्त्रियांचा सन्मान व सहभाग:
- १५०० हून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग.
- आदिवासी, उपेक्षित गटातील महिलांना मंच व ओळख देण्याचा सुंदर उपक्रम.
- स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार.
सांस्कृतिक कार्यक्रम:
- “स्त्रीजीवनाचे चार टप्पे” यावर आधारित नृत्यनाटिका.
- लोककला (भारूड, लावणी, गोंधळ) सादर करून स्त्रीशक्तीचे विविध पैलू दाखवले.
- काव्यवाचन, संवाद आणि महिलांचे अनुभवकथन.
आदर्श गृहिणी व सामाजिक कार्यकर्तींचा सन्मान:
- “झेप प्रेरणा पुरस्कार” द्वारे ५ महिलांना गौरवण्यात आले.
- विविध विभागातील महिलांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
वितरण व सेवा उपक्रम:
- सर्व महिलांना हळदी-कुंकू, छोटा आरसा, कुंकू डबी, आणि झेप ब्रँडेड कापडी बॅग वाटप.
- प्रत्येक महिलेला “सणगाठोळा” व सुवासिक तेलाचा उपहार.
डिजिटल उपस्थिती:
- कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियावर.
- सहभागी महिलांची ग्रुप फोटो गॅलरी झेपच्या फेसबुक व इंस्टाग्रामवर प्रकाशित.