झेप फाऊंडेशन
चित्रा पाटील
झेप फाऊंडेशन
- रायगड जिल्ह्यात विशेषतः महिला सक्षमीकरणाच्या कार्यात अग्रेसर असणारी संस्था म्हणून ‘झेप’ संस्था कार्यरत आहे.
- खारेपाट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनामुळे झेप संस्था आणि झेप संस्थेच्या अध्यक्षा सौ. चित्रा पाटील यांचे नाव संपूर्ण देशात पोहचले आहे.
- झेप या संस्थेने रायगड जिल्ह्यात स्वतःच्या सामाजिक विकासाच्या ध्येयामुळे सामान्य लोकांमध्ये एक विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. संस्थेने परिसरातील महिलांच्या दृष्टीने एक आदर्श निर्माण केला असून, महिलांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी संस्था अध्यक्षा चित्रा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, आ. जयंतभाई पाटील व आ. पंडितशेठ यांच्या मार्गदर्शनाद्वारे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे.
- संस्थेने आजवर अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यातील मुख्य म्हणजे “खारेपाट महोत्सव”.
- खारेपाटातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या ध्येयाने प्रेरित ‘झेप’ संस्थेने खारेपाट महोत्सव हि अभिनव कल्पना राबवून सगळ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. महिलांच्या बचत गटांना, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी आणि खारेपाटातील संस्कृतीचे जगाला दर्शन व्हावे या उद्देशाने खारेपाट महोत्सवाचे आयोजन होत असते.